आवळा एक आयुर्वेदातील अमृत!

आवळा एक आयुर्वेदातील अमृत!

आवळा एक आयुर्वेदातील अमृत!

Blog Article

आवळा एक आयुर्वेदातील अमृत!

आवळ्याचा उल्लेख हा चरक संहिता, सुश्रुतसंहिता,अष्टांगहृदय, भैषज्यरत्नावली आदी ग्रंथांमध्ये आवळ्याचा महिमा आणि त्याचे वर्णन केलेले आपल्याला पाहायला मिळते. आज आपण या लेखामध्ये आवळ्याचे आयुर्वेदातील स्थान तसेच त्याचे बहुगुणी फायदे आणि वापरण्याची पद्धती जाणून घेणार आहोत.

आवळ्याचे आयुर्वेदातील स्थान (Importance of Amla in Ayurveda):

* आवळा (Emblica officinalis / Indian Gooseberry) आयुर्वेदामध्ये एक अत्यंत पवित्र व शक्तिशाली औषधी फल मानले जाते. त्याला "रसायन"म्हणजेच शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्त औषध असे स्थान दिले गेले आहे.

* त्रिदोष नाशक फल: आवळा हे त्रिदोषशामक आहे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवतो.

विशेषत: पित्तशामक म्हणून उपयोगी आहे.

* रसायन (Rejuvenator): आवळा हे एक श्रेष्ठ रसायन औषध आहे, म्हणजेच शरीराला नवीन उर्जा देणारे, दीर्घायुष्य देणारे.

* 'चरक संहिता' मध्ये त्याचा उल्लेख 'कायाकल्प' करणाऱ्या औषधांमध्ये केला आहे.

* पाचन व यकृतासाठी हितकारक: दीपन-पाचन: म्हणजेच अन्न पचवण्याची शक्ती वाढवतो. यकृत (liver) आणि पाचन संस्थेचे आरोग्य सुधारतो.

* नेत्र आणि केसांसाठी श्रेष्ठ: get more info नेत्रदृष्टि वाढवतो, डोळ्यांतील जळजळ कमी करतो. केस काळे, मजबूत आणि चमकदार ठेवतो.

* वातरक्त, मधुमेह व हृदयविकारांमध्ये उपयुक्त: रक्तशुद्धी, मधुमेह नियंत्रण, हृदयासाठी टॉनिक म्हणून कार्य करतो.

* धार्मिक व आध्यात्मिक स्थान: आवळा वृक्षाला पवित्र मानले जाते.

* आवळा नवमी या दिवशी त्याची पूजा केली जाते.

छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात आणि गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर आपण आज या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊयात.

आवळा (Indian Gooseberry) हा एक अत्यंत प्रभावी आणि बहुगुणी आयुर्वेदिक घटक आहे. त्याच्या पावडरचा उपयोग अनेक रोगांवर आणि शरीर स्वास्थ्यासाठी केला जातो. रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून इम्यूनोमॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते आणि आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच तुम्ही नियमित आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्यास अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रतिकारकशक्ती अधिक वाढण्यासाठी याचा उपयोग होतो.

* वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:

आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी करणारे) आणि अँटिऑक्सिडंट्स गुण आढळतात. यामुळे आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही. चयापचयाची क्रिया व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग केला जातो. नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास तुमचा पचनक्रियेचा त्रास नक्कीच दूर होईल. तसेच वजनही नियंत्रणात राहील.

* पचनक्रिया उत्तम राहते:

आवळ्याला एक आदर्श फळच म्हटले जाते. कारण यामध्ये अनेक गुण असून शरीरासाठी याचे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते. पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरूवात होते. वास्तविक यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्रास कमी होतो. फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्धकोष्ठासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्याच्या पावडरमुळे पचनक्रिया उत्तम होऊन अन्य त्रासापासून सुटका मिळते.

हृदय स्वास्थ्यासाठी*

एका शोधामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. याशिवाय याचा उपयोग हायपोलिपिडेमिक एजंट स्वरूपातही होतो. यामुळे रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणे सोपे होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते. यामुळे हृदय रोगापासून तुम्हाला दूर राहता येते आणि हृदयाची काळजीही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते.

* लिव्हर निरोगी ठेवते: अनेक अँटिबायोटिक आणि औषधांच्या गोळ्या अथवा सतत दारूचे सेवन हे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थांचे निर्माण करते. पण नियमित आवळा पावडरचा समावेश आपल्या आहारात करून घेतला तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.

आवळा पावडरचे आयुर्वेदिक फायदे (Amla Powder Ayurvedic Benefits):

* पचन सुधारते: आवळा पावडरमध्ये फायबर हे भरपूर प्रमाणात असते, जे पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता व गॅस या समस्या कमी होतात.

* रोगप्रतिकारशक्ती वाढवते: यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

* केसांसाठी फायदेशीर: केस गळती, अकाली पांढरे केस आणि टक्कल यावर उपयोगी त्याचप्रमाणे केसांना चमक व मजबुती मिळते.

* त्वचेसाठी गुणकारी: त्वचेवर चमक येते. तसेच दाग, पिग्मेंटेशन, आणि चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

* रक्तशुद्धी: आवळा पावडर रक्तातील विषारी घटक काढून टाकते तसेच त्वचारोग टाळण्यास मदत करते.

* यकृत (Liver) व मूत्रपिंड (Kidney) स्वास्थ्यासाठी:

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते. त्यामुळे यकृत कार्य सुधारते.

* मधुमेह नियंत्रित करण्यासाठी: रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

* वजन कमी करण्यात मदत: पचनक्रिया सुधारल्यामुळे चरबी साठण्याचा वेग कमी होतो.

* 1 चमचा आवळा पावडर कोमट पाण्यात किंवा मधात मिसळून** रोज सकाळी उपाशी पोटी घेता येतो.

Report this page